मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

पंतप्रधान मोदी–मॅक्रॉन भेट; भारत-फ्रान्स राफेल कराराची शक्यता !

By team
On: February 17, 2026 5:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील उच्चस्तरीय बैठक मुंबईतील लोकभवन येथे सुरू झाली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि भारत-फ्रान्स भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत अंदाजे ₹३.२५ लाख कोटींचा संरक्षण करार होण्याची शक्यता आहे, जो भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी करार मानला जात आहे. या कराराअंतर्गत भारताला ११४ राफेल लढाऊ विमाने मिळतील.

यातील २४ विमाने ‘सुपर राफेल’ (F-5 आवृत्ती) असतील, ज्यात फ्रान्सची कंपनी दसॉ एव्हिएशन प्रगत तंत्रज्ञानासह विमाने तयार करणार आहे. सध्या भारतीय हवाई दलाकडे असलेली F-3 आवृत्ती 4.5 जनरेशनची असून, स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता असते. नवीन करारामध्ये मिळणारी F-4 आवृत्ती अधिक प्रगत प्रणालीसह येईल, तर २०३० नंतर मिळणारी F-5 सुपर राफेल अत्याधुनिक तंत्रज्ञानासह युरोपियन मानकांनुसार प्रगत श्रेणीत येईल.

या करारानंतर भारत असे निवडक देशांमध्ये सामील होईल, ज्यांच्याकडे अत्यंत प्रगत राफेल लढाऊ विमानांचे तंत्रज्ञान असेल. यामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणि तंत्रज्ञान पातळी या दोन्हीमध्ये मोठी वाढ होणार आहे. बैठकीत संरक्षण, सागरी सहकार्य, इंडो-पॅसिफिक रणनीती, उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे.

भारत आणि फ्रान्स यांच्यात 1998 पासून धोरणात्मक भागीदारी आहे. दोन्ही देश संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रात दीर्घकाळ सहकार्य करत आहेत. मॅक्रॉन यांचा हा भारत दौरा चौथा आहे; त्यांनी यापूर्वी मार्च 2018, सप्टेंबर 2023 (G20 शिखर परिषद) आणि जानेवारी 2024 (प्रजासत्ताक दिन) दरम्यान भारत भेट दिली होती.

सायंकाळी 5:15 वाजता पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन भारत-फ्रान्स इनोव्हेशन इयर 2026 चे उद्घाटन करतील. यामध्ये दोन्ही देशांतील उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, संशोधन तज्ञ आणि नवनिर्मितीशी संबंधित लोकांना संबोधित केले जाईल. हा दौरा भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी आणि हवाई दलाच्या तंत्रज्ञान क्षमतेत मोठी भर घालण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment