मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपूर्वीच वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रासह आठ महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचा ई-मेल संबंधित संस्थांना आला होता. यानंतर सर्व ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली, मात्र अखेर ही धमकीच निघाली. मुंबईत गेल्या वर्षभरापासून धमकीचे फोन आणि मेल येण्याचे सत्र सुरूच आहे.
अज्ञात क्रमांकावरुन मुंबई पोलिसांनी धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मसेजमध्ये देण्यात आली आहे. बुधवारी रात्री पुणे पोलिसांनाही असाच धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला आहे. या धमकीच्या मेसेजनंतर पोलिस सतर्क झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा एक मेसेज आला आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे त्या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. हीदेखील अफवा असल्याने ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 505 (1) (ब) (नागरिकांमध्ये भीती किंवा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने अफवा पसरवणे), 506 (2) (गुन्हेगारी धमकी) आणि इतर कलमांतर्गत कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.