ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट येथील मलगोंडा हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू !

अक्कलकोट: प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. मलगोंडा हॉस्पिटलमध्ये केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना आणि महाराष्ट्र शासनाची माहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत कॅन्सर, अस्थिरोग आणि मूत्रविकार यांसारख्या गंभीर आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत.

कॅन्सरवर अत्याधुनिक उपचार मोफत उपलब्ध 

या योजनेअंतर्गत तोंडाचा, जिभेचा, स्तनाचा, फुफ्फुसाचा, आतड्याचा, गर्भाशयाचा आणि अंडाशयाचा कर्करोग यावर उपचार दिले जाणार आहेत. तसेच थेरेपी, केमोथेरपी, हार्मोन थेरपी आणि डे-केअर थेरपी यांसारख्या अत्याधुनिक सेवा देखील रुग्णांना विनामूल्य मिळतील.

विशेषज्ञ डॉक्टरांची सेवा

या उपचारांसाठी कॅन्सर तज्ञ डॉ. प्रथमेश मलगोंडा आणि डॉ. सुमा मलगोंडा हे स्वतः रुग्णसेवा देत आहेत. ही योजना ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, महागड्या आजारांवर मोफत सेवा मिळणार आहे.

गोरगरीबांसाठी मोठा दिलासा

ग्रामीण भागातील रुग्णांना आता मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज नाही. मलगोंडा हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने अनेक गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी मलगोंडा हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!