---Advertisement---

बाळासाहेबांच्या विचारांवर पंतप्रधान मोदींचे काम चालतेय ; विनोद तावडे

By team
On: April 24, 2024 2:25 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे जात आहे, हाच कोकण वासियांसाठी भावनिक मुद्दा असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची पहिल्यांदा भेट घेतली त्यावेळी महाराष्ट्राचा वाघ गुजरातच्या सिंहाचा स्वागत करतोय, हे बाळासाहेबांचे शब्द होते, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विनोद तावडे यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोकण आणि शिवसेना यांचे अतूट नाते होते. मात्र यावेळी कोकणामध्ये धनुष्यबाण चिन्ह नसेल, या प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे पंतप्रधान मोदी पुढे जात असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांची ज्यावेळी भेट घेतली होती, त्यावेळी मी तेथे उपस्थित होतो. महाराष्ट्राचा वाघ गुजरातच्या सिंहाचे स्वागत करत आहे, अशा शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले होते, अशी माहिती देखील विनोद तावडे यांनी या वेळी दिली.

बाळासाहेबांचा विचार कमळा बरोबर आहेत. हा कोकण वासियांना सर्वात जास्त पटणारा आणि त्यांचा भावनेचा विषय आहे. बाळासाहेबांच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी चालतात, असा दावा देखील विनोद तावडे यांनी केला आहे. बाळासाहेबांचे प्रेम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!