ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा, महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर

दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जात असल्याच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केल्याने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन लाख कोटींच्या २२५ औद्योगिक प्रकल्पांची घोषणा केली आहे.

राज्य सरकारतर्फे आज मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजुर करण्यात आल्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील तरुणांना भविष्यात असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितले.

केंद्र सरकार देशातील पायाभूत सुविधांसाठी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून त्यामुळं रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. त्यातच आता सरकारनं महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजुर केले असून या प्रकल्पांवर काम सुरू आहे अथवा सुरू होत आहे. यात रेल्वेच्या विस्तारासाठी ७५ हजार कोटी रुपये आणि रस्ते विकासासाठी ५० हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याचीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!