ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोमय उत्पादनाला चालना देण्यासाठी अक्कलकोट येथे उत्पादन विक्री स्टॉल

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

गोमय उत्पादनाची विक्री वाढावी, त्याचे आयुर्वेदिक महत्त्व समजावे, यासाठी अक्कलकोट बसस्थानकाच्या बाहेर स्वामी शिवानंद योगींद्र गोवंश केंद्र, शिवपुरी यांच्यावतीने उत्पादन विक्री स्टॉल लावण्यात आले होते. त्याद्वारे गोमय उत्पादनांची विक्री करण्यात आली.महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विश्व फाउंडेशनचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या स्टॉलचे उद्घाटन डॉ. दिनेश मुरूमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दीपक कडवे, डॉ.एम.ए. मणेरी, डॉ. मुस्तफा बागवान, डॉ.तुकाराम कांबळे, विश्व फाउंडेशन संस्थेच्यावतीने डॉ.गणेश थिटे ,संजय अग्रवाल ,मिलिंद पाटील , विनोद मोरे,रवी पवार,सरफराज तांबोळी आदींची उपस्थिती होती.व्याहती होम करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

देशात २६ राज्यात या वर्षीपासून ३० एप्रिल हा दिवस गो उत्पादने विक्री दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त त्या दिवशी जिल्ह्यातील सहा ठिकाणी गोमय उत्पादनांचे स्टॉल लागले.सोलापूर जिल्ह्यात सुमारे ३५ नोंदणीकृत गोशाळा आहेत. आयोग यानोंदणीकृत गोशाळांच्या माध्यमातून गोसंवर्धनाचे काम करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६ गोशाळांकडून गोमय उत्पादनांची निर्मिती केली जात आहे.

या अंतर्गत अक्कलकोट येथे हा उपक्रम घेण्यात आला. या स्टॅलमुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत या उत्पादनाची माहिती मिळेल, जीवन सुखकर होईल.गोशाळेत तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांचा जनसामान्यांत प्रसार व्हावा आणि गोशाळांनी तयार केलेल्या गोमय मूल्यवर्धित उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासह त्यांना स्वयंनिर्भर बनवण्यासाठी गो उत्पादन विक्री दिवस साजरा करण्यात आला,असे डॉ. गणेश थिटे यांनी सांगितले. जिल्ह्यात सहा ठिकाणी असे स्टॉल लावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!