---Advertisement---

माजी आ.अरुण जगताप यांचे निधन !

By team
On: May 2, 2025 9:31 AM
Follow Us:
---Advertisement---

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

राज्यातील अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 67 व्या वर्षीं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुणकाका जगताप यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अरुणकाका जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्ष, तसेच सलग दोनवेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलं आहे. अहमदनगर शहर मतदारसंघातून मात्र ते दोनवेळा पराभूत झाले. महापालिकेत ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र स्वत:ऐवजी त्यांनी त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप यांना महापौर केले. जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. याशिवाय क्रीडा क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता. ते अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य होते. शिक्षण क्षेत्रातही योगदान देताना गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र ते सहा महिनेत तिथे रमले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे सलग तीनवेळा अहिल्यानगर शहर मतदारसंघातून निवडून आले तर दुसरे चिरंजीव सचिन हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते.त्यांच्या सून शितल संग्राम जगताप या नगरसेविका आहेत. सून सुवर्णा सचिन जगताप या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. सुपुत्र सचिन अरुण जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.

अरुण जगताप यांचे पार्थिव दुपारी 2 वाजता दर्शनासाठी त्यांच्या भवानीनगरमधील घरी ठेवण्यात येणार आहे. यानंतर 4 वाजता अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भवानीनगर-महात्मा फुले चौक, जिल्हा सहकारी बँक, स्वस्तिक चौक, टिळक रोड मार्ग, आयुर्वेद कॉलेज,बाबावाडी, नालेगाव अमरधाम असा त्यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग असणार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!