---Advertisement---

अक्कलकोट – नळदुर्ग रस्ता प्रकरणी उस्मानाबादला आक्रोश मोर्चा ; चर्चेसाठी २२ जानेवारीला नळदुर्ग येथे बैठक

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट ते नळदुर्ग रस्त्यातील शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी येत्या रविवारी दि.२२ जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी दिली. यासंदर्भात २७ जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी होणारी बैठक शहापुर रोड, गणेश मंदिर नळदुर्ग येथे होणार आहे. या बैठकीत शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने दिनांक २७ जानेवारी रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनात संदर्भात चर्चा करून पुढील दिशा ठरवणे, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या २४ तारखे संबंधित सविस्तर चर्चा, आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी भोगवाटदार २ करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात हा आक्रोश मोर्चा आहे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीस शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!