पुणे, वृत्तसंस्था
पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे. सोलापूर-दौंड दरम्यान रेल्वेगाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने येत्या काही दिवसांत धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून, पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी १३० धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी दिली.
पुणे विभागातून पुणे-दौंड दरम्यान सध्या रेल्वे ताशी १३० किमी वेगाने धावत आहे. यामुळे पुणे-दौंड प्रवास वेगात सुरू आहे. परंतु सोलापूर विभागातील दौंड-सोलापूर दरम्यान रेल्वे रूळ व इतर पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाले आहे. त्यांची पाहणी महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी नुकतेच केली. सध्या दौंड-सोलापूर दरम्यान ताशी ११० किमी वेगाने रेल्वे धावतात. त्यामुळे वेळ जास्त लागतो.
पुढील काही दिवसांत रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे फायदा होणार असून मेल, एक्स्प्रेस आणि डेमू यांचा वेग वाढल्याने प्रवासातील वेळ कमी आहे. त्यामुळे पुण्यातून तीन-साडेतीन तासांत सोलापूरला पोहोचणे शक्य होणार आहे. येत्या १५ दिवसांत याची अंमलबजावणी होणार आहे.