---Advertisement---

आ. रणजीतसिंह मोहिते पाटलांना आणखी एक धक्का

By team
On: December 19, 2024 1:19 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर वृत्तसंस्था 

 

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झालीय. त्यांच्या विरोधात पक्षाकडून कारवाईला सुरूवात झाली आहे. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आता सहकार विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवला असल्याने त्यांना त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखाना संचालक पदावरून का अपात्र ठरवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या शंकर सहकारी साखर कारखान्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अध्यक्ष असून या कारखान्याला भाजप सरकारने मोठे आर्थिक पॅकेज दिलेले आहे. मात्र, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील  यांनी पक्ष विरोधी काम केल्याच्या तक्रारीनंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता यानंतर लगेच त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावरून अपात्र का ठरवू नये अशा पद्धतीची नोटीस दिली असून 16 जानेवारी पर्यंत त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. या वेळेत जर त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास त्यांचे संचालक पद रद्द करण्यात येणार आहे, त्यामुळे आता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रणजीतसिंह मोहिते पाटील यांना भाजप पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका रणजीतसिंह पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आमदार रणजितसिंह पाटील यांना नाटीस पाठवली आहे. तसेच या नोटीसवर सात दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश देखील रणजीतसिंह पाटील यांना देण्यात आले आहे. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते पाटील यावर काय निर्णय घेणार, कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

प्रकरण काय ?

राज्यात पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उघड प्रचार केला होता. लोकसभेला त्यांचे चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी थेट शरद पवार गटात प्रवेश करून भाजपचा पराभव केला होता. मोहिते पाटील कुटुंबाने माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभूत करण्याचा प्रयत्न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून हकालपट्टीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना नोटीस पाटवण्यात आली आहे. त्याचबरोबर आता त्यांना सहकार विभागाने देखील कोंडीत पकडण्यास सुरूवात केली आहे. शंकर सहकारी साखर कारखाना संचालक पदावरून का अपात्र ठरवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!