---Advertisement---

पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल

By team
On: December 6, 2024 11:47 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर वृत्तसंस्था 

तुम्हीही पुणे सोलापूर मार्गावरून प्रवास करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्की वाचा. पुणे- सोलापूर रोडवर मम्मादेवी चौक ते अर्जुन रोड टी जंक्शनदरम्यान एम. पी. पेट्रोलपंपाजवळ पिण्याची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. याची सुरुवात शुक्रवारी (दि. 6) रात्री 8 पासून होणार असून, हे कामकाज दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा पुणेकडून सोलापूरकडे जाणार्‍या रोडवर व दुसर्‍या टप्प्यात सोलापूरकडून पुण्याकडे येणार्‍या रोडवर खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर रोडवरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

 

असा आहे वाहतूक बदल

 

सोलापूरकडून स्वारगेटला जाणारी वाहतूक सरळ अर्जुन रोड मम्मादेवीमार्गे स्वारगेटकडे जाईल, यात कोणताही बदल नाही.

स्वारगेटकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक मम्मादेवी चौकात सरळ जाण्यास बंदी असून, डावीकडे वळून बिशप सर्कल उजवीकडे वळून सोलापूर रोडला जातील. सदर मार्ग हा वन वे करण्यात येत आहे.

सोलापूरवरून येणार्‍या वाहनांना बंदी असून, सदर वाहने ही सरळ मम्मादेवी गोळीबार चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

डॉ. कोयाजी रोडने येणारी वाहने हरप्रीत मंदिर चौकात उजवीकडे वळून खाणे मारुती चौक पुलगेट बस डेपोमार्गे कोंढव्याला जातील.

सोलापूरकडून येणारी वाहने मम्मादेवी चौकात उजवीकडे वळण्यास बंदी असून, ती गोळीबार चौक सरळ व उजवीकडे वळून कॅम्पमार्गे इच्छितस्थळी जातील.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!