---Advertisement---

श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१८ : महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आले आहे.शनिवार दि २२ मे रोजी होणारे अक्कलकोट येथील श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा ७१ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कोरोना संसर्गजन्य रोगामुळे प्रशासनाने सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमावर घातलेल्या निर्बंधामुळे पुण्यतिथी महोत्सवात होणारा प्रवचन, पारायण, शिवनाम सप्ताह, सामुदायिक विवाह, पालखी मिरवणूक,रथोत्सव, कैलास मंडप पूजा व भस्म पूजा यासारखे होणारे धार्मिक, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

यंदाच्या वर्षी फक्त श्री सद्गुरू चिक्क रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी यांच्या हस्ते नैमित्तिक पूजा होणार आहे.या पूजेमध्ये कोणालाही सहभागी होता येणार नाही.तसेच या काळात दर्शन बंद असल्याने कोणीही मठाकडे येऊ नये.सर्व सद्भक्तांनी आपल्या घरीच प्रतिमा पूजन करून पुण्यतिथी महोत्सव साजरा करावा आणि शक्य झाल्यास आपल्या घरी साजरा केलेला फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करावा असे आवाहन श्री रेवणसिद्ध शिवशरण मठ ट्रस्ट,शरण मठ वागदरी रोड अक्कलकोट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!