दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता कोरोना चाचणी, अक्कलकोटमध्ये १३० जणांची झाली तपासणी

  मारुती बावडे अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोट शहरात आता दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी सुरू आहे. आज पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेअंतर्गत १३० जणांची तपासणी करण्यात आली.या मोहिमेचा आज दुसरा दिवस होता. अक्कलकोट येथील कारंजा चौकात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात ग्रामीण भागातील लोक हे खरेदी-विक्रीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने येतात. … Read more

श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

अक्कलकोट, दि.१८ : महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आले आहे.शनिवार दि २२ मे रोजी होणारे अक्कलकोट येथील श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा ७१ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना संसर्गजन्य रोगामुळे प्रशासनाने सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमावर घातलेल्या निर्बंधामुळे पुण्यतिथी महोत्सवात होणारा प्रवचन, … Read more

अक्कलकोट शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही, डीवायएसपी डॉ. गायकवाड यांची कारवाई

अककलकोट दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यू दर वाढला आहे. रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विचारणा होत असून अतिआवश्यक काम असेल तरच सोडले जात आहे अन्यथा त्याच्यावरती विनाकारण फिरत … Read more