---Advertisement---

अक्कलकोट शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही, डीवायएसपी डॉ. गायकवाड यांची कारवाई

Follow Us:
---Advertisement---

अककलकोट दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यू दर वाढला आहे. रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांनी
आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विचारणा होत असून अतिआवश्यक काम असेल तरच सोडले जात आहे अन्यथा त्याच्यावरती विनाकारण फिरत असल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे त्यांना या कामात सहकार्य करत आहेत.अक्कलकोट शहरात रविवारी सकाळपासून पोलीस प्रशासनाकडून ही धडक कारवाई सुरू आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरातील वाढत चाललेली गर्दी पाहता पोलीस प्रशासनाकडून मोटारसायकलवर डबलसीट फिरणारे व कार आणि इतर वाहनामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे प्रवाशी आहेत की नाही,याची पाहणी करून दंडात्मक कारवाई करत आहेत.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी नागरिकांना गर्दी न करता नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

या कारवाईमुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल असा विश्वासही पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!