ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राहुल गांधी यांना ‘’या’’ प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा

दिल्ली : २०१९ मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले असून आता त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोदी आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल राहुल यांच्यावर गुन्हेगारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणा दरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असे म्हंटले होते. या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!