ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुजरातमध्ये पावसाचा कहर : ८ जणांचा मृत्यू, शाळा, महाविद्यालयेही बंद

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून देशातील गुजरात राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने वडोदरा, सुरत, भरूच आणि आणंदसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथे पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या जिल्ह्यांतील सखल भागातील 826 लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही तैनात करण्यात आली आहे. रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे, नेपाळमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे उत्तर प्रदेशात राप्ती नदीला पूर आला आहे. त्यामुळे गोरखपूरमधील 50 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथेही एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तैनात करण्यात आले आहेत.

याशिवाय बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये (सागर, टिकमगड आणि बिना) पूरसदृश स्थिती आहे. आजही येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज, गुरुवार, 25 जुलै रोजी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. आज एकूण 16 राज्यांमध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!