---Advertisement---

मनसे एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही..

By team
On: October 26, 2024 6:45 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

मुंबई वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  त्यात मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून देखील अभिजित यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले होते. आता ठाण्यात, ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव, ओवळा  इथून संदीप आणि कळवा मुंब्रा येथून सुशांत हे उमेदवार विधानसभा निवडणूक लढणार आहेत. 

मुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. जरी अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेने सदा सरवणकर यांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!