---Advertisement---

विद्यापीठाकडून मराठी विषयासाठी बुधवारी पेटची फेर परीक्षा!

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.13- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून मराठी विषयाची पीएचडीची फेर प्रवेश परीक्षा बुधवार, 15 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी दिली.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून विविध विषयांची पीएचडी प्रवेश परीक्षा नुकतीच पार पडली आहे. मराठी विषयाचीही परीक्षा घेण्यात आली होती, मात्र मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मुद्रणदोष व तांत्रिक कारणामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित होते, त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीही आल्या होत्या. त्याची शहनिशा करून पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय परीक्षा विभागाकडून घेण्यात आला आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने 15 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा द्यावी असे आवाहन परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!