सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेतले आहे मात्र अनेक तरुण तरुणी आज देखील बेरोजगार आहे. याच बेरोजगार तरुणांना एक नोकरीची मोठी संधी समोर आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने ११२ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार www.zpsolapur.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता: पदानुसार, १२ वी उत्तीर्ण, एमडी, एमएस, डीएनबी, डी.फार्मा, बी.फार्मा
वयोमर्यादा:
जास्तीत जास्त ७० वर्षे
पगार:
पदानुसार दरमहा १८,००० ते ७५,००० रुपये
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा
- मुलाखत
शुल्क:
- सामान्य: १५० रुपये
- राखीव श्रेणी: १०० रुपये
अर्ज कसा करावा:
- अधिकृत वेबसाइट zpsolapur.gov.in ला भेट द्या.
- जिल्हा परिषद सोलापूर भरती किंवा करिअर विभागावर क्लिक करा.
- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्ससाठीचा फॉर्म सूचना लिंकवरून डाउनलोड करा.
- फॉर्म सबमिट करा आणि फी भरा.
- त्याची प्रिंटआउट ठेवा.