ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिलांना दिलासा : दीपक वायकरांची अशी ही समाजसेवा !

गुरुमाऊली मंडळ व कारंजा चौक ट्रस्टचा उपक्रम

अक्कलकोट : प्रतिनिधी

आजकाल स्वार्थी दुनियेमध्ये समाजसेवा करणारे लोक खूप कमी झालेले आहेत परंतु दीपक वायकर यांच्या सारखे स्वामी सेवक आजही समाजसेवा करतात ही बाब समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार समाधी मठाचे पुजारी धनंजय महाराज पुजारी यांनी केले.

अक्कलकोट येथे गुरुमाऊली भजनी मंडळ पुणे व कारंजा चौक नवरात्र महोत्सव ट्रस्ट यांच्यावतीने १२५ गरजू वंचित महिलांना एक महिना पुरेल एवढे शिधावाटप व साडी वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.पुणे येथील स्वामी सेवक दीपक वायकर व त्यांच्या सर्व सभासद यांनी अक्कलकोट येथे येऊन हा कार्यक्रम घेतला आणि गोरगरीब वंचित महिलांना दिलासा दिला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय पुजारी गुरुजी हे उपस्थित होते.अक्कलकोट शहरातील गरीब गरजू वंचित या महिलांना साडी व एक महिना पुरेल एवढे पूर्ण अन्नधान्य किट वाटप करून वायकर यांनी समाजाची सेवा केलेली आहे.अशा प्रकारचे काम करणारे लोक समाजात दुर्मिळ आहेत त्यांना साथ देणे हे आपले कर्तव्य आहे,असे सुधीर माळशेट्टी यांनी सांगितले.

या कार्यक्रमास दुष्यंत झांजले, बंटी जाधव, संकेत रकटे, सनी सिद्ध, अमित कदम, युवराज याळवंडे, सागर गायकवाड, अश्विनी वायकर, सोनाली जाधव,शितल हडके,स्नेहा माळशेट्टी ,प्रज्ञा माळशेट्टी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर माळशेट्टी व केदार माळशेट्टी यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!