---Advertisement---

कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ ; मनोज पाटलांचा हल्लाबोल !

By team
On: December 2, 2023 11:08 AM
Follow Us:
---Advertisement---

जालना : वृत्तसंस्था

राज्यातील जालन्यात नुकतेच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. “सगळ्यांच्या टॉच चालू करा. एकही टॉर्च बंद ठेवू नका. आता ते काही झोपत नाही गड्या. हिंगोलीत येऊन गप्पा हाणतो. इकडे येतो आणि जातीवाद करतो. घटनेच्या पदावर बसतो, सरकारसोबत राहतो, आणि महापुरुषांच्या जाती काढणारा, भारतातला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गुण्यागोविंदाने जगत असताना त्यांच्यामध्ये दंगली घडवण्याचं काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

स्वत:चं वय झालेले असताना, कायद्याच्या पदावर बसलेला असताना, कायदा पायदडी तुडवणारा, इतक्या खालच्या दर्जाचा माणूस आतापर्यंत कधी झाला नाही. या भारत देशात आणि महाराष्ट्रात महापुरुषांच्या जाती काढणारा आतापर्यंत एकही व्यक्ती झाला नाही. यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या, राजद्रोह सारखा प्रकार हा माणूस करायला लागला आहे. जाती-जातीत दंगली भडकवण्याचा प्रकार करायला लागला आहे”, असा आरोप मनोज जरांगेंनी केला.
मराठा ओबीसी आरक्षणामध्ये आहे. तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षण न देण्याचा चंग या माणसाने बांधला. मराठा ओबीसी आरक्षणात असताना ७० वर्षांपासून याच्या दबावाखाली सरकार आलं आणि असणाऱ्या नोंदी, मराठ्यांना असणारे आरक्षण या एकट्याने मिळू दिले नाही. तुम्ही २४ डिसेंबरला छगन भुजबळ यांचं ऐकून दगाफटका केला तर आंदोलन शांततेत असणार पण ते किती डेंजर असणार मग तुम्हाला त्या वेळी समजेल, अशा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!