ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन्नछत्र मंडळ वाहनतळ ते सोलापूर – मैंदर्गी बायपास रस्ता विकसित करा !

अक्कलकोट : प्रतिनिधी

अक्कलकोट तीर्थक्षेत्री स्वामी दर्शनार्थ आलेल्या भाविकांची वाहने सुलभ मंदिर परिसरातुन विना अडथळा जाण्यासाठी. अन्नछत्र मंडळाच्या एस.टी वाहनतळ ते मैंदर्गी रस्ता ते सोलापुर बाह्यवळण राष्ट्रीय महामार्ग रस्त्याला जोडणारा अंत्यत जवळचा सुलभ कमी, श्री वटवृक्ष मंदिर, अन्नछत्र मंडळ परिसरात वाहतुकीची कोंडी कमी करणारा, वाहतूक खर्चामधला पुर्वापार वहिवाटीचा पांदीतील रस्ता. विकसित करा अशी मागणी स्वामी भक्तामधुन तसेच मैंदर्गी रस्त्याकडे राहणाऱ्या रहिवाशा कडून करण्यात येत आहे.

मैंदर्गी रस्त्याकडे राहणाऱ्या रहिवाशाना शहरात येण्यासाठी भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरातुन जाणारा मार्ग बंद झाला आहे. गुरुवार शनिवार रविवार पोर्णिमा उत्सव यामुळे शहरात जाण्या येण्यासाठी मैंदर्गी रोडकडे राहणाऱ्या रहिवाशाना अंत्यत अडचणीचे व मंदिर परिसरातील वाहनांच्या गर्दीमुळे धोकादायक झाले आहे. मैंदर्गी रस्ता स्वामी विश्व नगर समर्थ पार्क समर्थ विहार शिव पार्वती नगर मैंदर्गी रस्ता हद्द वाढ भागातील नागरिक अक्कलकोट शहरात प्रवेश करताना रोज अनेक समस्याना जावे लागत आहे. तातडीने नागरिकाला औषध घेण्यासाठी वैदयकीय उपचारासाठी जावे लागते.

भाविकांची रांग रस्त्यावर येत असल्याने परिसरातुन मोटार सायकल जाण्यासही पोलीसा कडून बॅरेकेट्स लावली आहेत पोलीसांनी प्रवेश बंद केला आहे. हे आता नित्याचेच झाले आहे यामुळे या परिसरातील नागरिकाना जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता पुर्वापार वहिवाटीची पांदीचा रस्ता रस्ता विकसित करुन दयावा. या रस्त्यामुळे भाविकाना वाहन तळ ते सोलापुर चार पदरी रस्त्याला व तुळजापुर -गाणगापुर रस्त्याला सुलभपणे जाता येईल, या रस्त्यामुळे अक्कलकोट शहर मंदिर परिसरातील वाहनांची वर्दळ कमी होईल, भाविकांची वाहतेही थेट बाह्यवळण रस्त्याला मार्गी लागतील वाहतुकीची कोंडी होणार नाही. भाविकांची वाहने सुलभपणे मुख्य रस्त्याला मार्गी लागतील.

चौकट :
वाहन तळ ते पांदीतुन पुर्वापार वहिवाट रस्ता ते चार पदरी माहामार्गास जोडणारा रस्ता निर्माण करणेबाबत निवेदन केंद्रीय रस्ते वाहतुक दळणवळण वळण मंत्रालय यांच्याकडे सादर करण्यात आले असुन हे प्रलंबित आहे.

बाह्यवळण मार्गाने मंदिराकडे थेट जाणाऱ्या भाविकाना नविन पर्यायी मार्ग मिळून अक्कलकोट शहरातील वाहतुकीची कोंडी वाहन पार्किंगची समस्या मार्गी लागेल अन्नछत्र मंडळ एसटी वाहन तळ ते पांदीतुन पुर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे तो तातडीने विकसित करणे गरजेचे बनले आहे.

तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरी दत्त अवतार श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या लीला कार्य महात्म्य मुळे सुपरिचित आहे. याबरोबर येथील यज्ञनगरीचे पर्यावरण शुद्धीचे अग्निहोत्र प्रसार प्रचार व ऐत्यासिक नविन राजवाडा शस्त्र संग्रहालय यामुळे पर्यटन वाढले आहे. गाणगापुर तुळजापुरच्या मध्यवर्ती अक्कलकोटच्या भौगोलिक रचनेमुळे भाविकांच्या मुक्कामाची मोठी पसंती तीर्थक्षेत्र अक्कलकोटलाच आहे यामुळे अक्कलकोटी भाविकांची संख्य प्रचंड वाढत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!