सोलापूर : वृत्तसंस्था
आज माळशिरस विधानसभा मतदारसंघ महायुतीची आढावा बैठक माळशिरस येथे संपन्न झाली. यावेळी भाजपा माळशिरस विधानसभा निवडणुक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य के के पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडला. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा ठराव माळशिरस तालुका महायुतीच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थांची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी आमदार राम सातपुते उपस्थित होते.
माळशिरस तालुका महायुतीच्या वतीने ठराव केला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा घ्यावा. तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थेची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मोहीते पाटील यांनी विविध संस्थेच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. या संस्थांची उच्चस्तरीय समिती कडुन चौकशी करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. यावेळी माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते व महायुतीचे मधील समाविष्ट पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.