ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बलिदान देणाऱ्या म्हेत्रे कुटुंबाविषयी शिवसेनेला आदर : पुरुषोत्तम बरडे

सोलापूर – हिंदुत्वासाठी बलिदान देणाऱ्या म्हेत्रे कुटुंबाबद्दल शिवसेनेला कायमच आदर आहे. ठाकरे कुटुंबातील सदस्य त्यांच्या घरी येऊन गेले, याचा अर्थच संकट काळात खंबीरपणे पाठीशी राहणारं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे असं वक्तव्य शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केलं.  भर पावसात शिवसंपर्क अभियाना करिता जमलेल्या प्रभाग क्र २० मधील शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत दादा धुत्तरगांवकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेता अमोल बापू शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण, नगरसेवक भारतसिंग बडुरवाले, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, उपशहरप्रमुख रविकांत कांबळे, सिद्धाराम कोरे, रोहित तडवळकर, विजय पुकाळे, रविकांत गायकवाड, अनिल गायकवाड व राज पांढरे आदींसह परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना बरडे साहेब म्हणाले, शिवसंपर्क अभियानाला शहरभर मिळणारा प्रतिसाद बघता, हे अभियान आणखी काही महिने घ्यावे लागेल असे वाटते. सध्या आपण प्रभागात एखाद-दुसरी बैठक घेतोय. परंतु बैठकांना शिवसैनिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता आपल्याला प्रत्येक प्रभागात किमान पाच-दहा बैठका घ्याव्या लागतील. संघटना वाढीसाठी प्रत्येक शिवसैनिकांनी आणि पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले.

शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर म्हणाले की, भीमाशंकर म्हेत्रे यांनी या भागात तीन वेळा नेतृत्व केलेलं आहे. संपूर्ण सोलापूर शहरातच एक आदर्श नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली होती. संपूर्ण हद्दवाढचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. नव्या रक्ताच्या शिवसैनिकांना सोबत घेत त्यांनी जास्तीतजास्त शिवसैनिक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
अमोल बापू शिंदे यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर ताशेरे ओढले आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची कार्यपद्धती सर्वसामान्य लोकांना भावणारी असल्याचे सांगितले.

उपजिल्हाप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण यांनी म्हेत्रेंच्या बलिदानाची आठवण सांगतानाच जो शिवसैनिकांना नडतो तो संपतो असं म्हटलं. शिवसेनेच्या शाखा वाढविल्या पाहिजेत व जास्तीतजास्त सदस्य नोंदणी करुन घेतली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.नगरसेवक भारतसिंग बडुरवाले म्हणाले, सेनेच्या जीवावर वाढलेली भाजपा गद्दार निघाली. पालिकेतला कारभारही अतिशय गलिच्छ आहे. विशेषतः या भागातील लोधी समाज सर्व ताकदीनिशी शिवसेनेच्या पाठीशी राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात ईरण्णा मसुती व लक्ष्मण पाटील यांनी शिवसेना सदस्यत्वाचे फॉर्म भरले. बैठकीच्या यशस्वीतेकरिता गुरुसिद्ध म्हेत्रे, काशिनाथ म्हेत्रे, अनिल कुंभार, उमाकांत म्हेत्रे, शरणप्पा जवळगीकर, सुरेश म्हेत्रे व नागेश म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन संतोष घोडके यांनी केलं, तर आभार संतोष पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!