सोलापूर – शिवाचार्यरत्न डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे लोककल्याणार्थ शरन्नरात्र पवित्र पर्व काळात घटस्थापनेपासून अनुष्ठान प्रारंभ झाला आहे. प्रातः शुचिर्भूत होऊन ध्यान धारणा त्यानंतर षडोषपचार इष्टलिंगास रुद्राभिषेक पूजा आरती नंतर दुर्गासप्तशती पारायण व सायंकाळी इष्टलिंग महापूजा व दुर्गासप्तशती पारायण असे केवळ जलप्राशन करून अनुष्ठान चालू आहे.
परंपरेप्रमाणे श्री शिवयोग धाम शेळगी येथील श्रीमठात घटस्थापनेपासून श्री वीरभद्रेश्वरास, माँ कालीभक्ती विशेष पूजा संपन्न होत आहे. दुर्गाष्टमी दिवशी होम हवन सुहासिनी पूजा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे डॉ. महास्वामीजी कोरोना महामारीतून मुक्तता मिळण्यासाठी गेल्या जानेवारी १४ तारखेपासून पूजा अर्चा बरोबर कठोर उपवास करीत आहेत. दशहरा दिवशी होम हवांनंतर बाल सुवासिनींच्या अनुष्ठान संपन्न होणार आहे.