---Advertisement---

पोटाला चाकू लावून तरुणाला लुटले !

By team
On: February 14, 2024 9:29 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

तरूणाच्या पोटाला चाकू लावून जबरदस्तीने रक्कम काढल्याची घटना ३० जानेवारी रोजी दुपारी जय मल्हार हॉटेल, विजापूर रोड येथे घडली. याप्रकरणी आशिष संजय माने (वय २८, रा. उजनी कॉलनी) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर रोडवरील जय मल्हार हॉटेलसमोर फिर्यादी आशिष माने हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या पोटाला चाकू लावून मारहाण केली. त्यांच्या बँक खात्यातून एटीएम व फोन पेद्वारे ऑनलाईन ट्रांजेक्शन करून ८० हजार रुपये रक्कम जबरदस्तीने काढली. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड असणारे पाकीट जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसवडे हे करीत आहेत. हॅण्डल लॉक करून ठेवलेली दुचाकी क्रमांक एमएच.१३. सीवाय.८६२६ ही चोरटयाने चोरून नेल्याची घटना दि. १७ ते १८ डिसेंबर २०२३ दरम्यान पाटील वस्ती, हत्तुर गाव येथे घडली. याप्रकरणी प्रकाश भोगप्पा पाटोळे (वय ५०, रा. पाटील वस्ती) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार हार हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!