ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दादांच्या स्वागताला रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी !

जामखेड : वृत्तसंस्था

राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रोहित पवारांनी अलीकडेच केलेल्या एक विधानाच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लक्षवेधी ठरले आहे. ते म्हणाले होते की ‘मलाही काकांना विचारावे लागते.’ या विधानावर पुनः सारवासारव करताना ते म्हणाले, व्यक्तिगत कुटुंबाचा एखादा निर्णय असेल किंवा पवार कुटुंबाला कौटुंबिक विषयाच्या बाबतीत फरक पडत असेल तर मला सुद्धा काकांना विचाराव लागत. काकांचा आणि आजोबांचा आशीर्वाद मला सुद्धा घ्यावा लागतो. त्यामुळे आताच्या पोस्टर मागे काही नवी समीकरणे तर बनत नाही ना याची उत्सुकता वाढली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच कर्जत-जामखेडच्या दौऱ्यावर येत आहे. रोहित पवारांच्या मतदारसंघात जाहीर कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांच्यावतीने शिव शाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे गुरुवारी (दि. १७) जामखेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याजोडीला राम शिंदे, विखे-पाटलांचीही उपस्थिती असणार आहे.

एकीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या वारंवार कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असतानाच दुसरीकडे रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!