---Advertisement---

दमदाटी तुमच्या घरात चालवा ; सुळेंचा अजितदादांना इशारा

By team
On: May 11, 2024 10:44 AM
Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या तोफा आज राज्यातील काही भागात थंडावणार असतांना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र विरोधकांवर सोडले आहे. नुकतेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे.

दमदाटी तुमच्या घरात चालवा. सुसंस्कृत महाराष्ट्रात तुमची दमदाटी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘माझ्या नादी लागणाऱ्यांचा पुरता मी बंदोबस्त केला आहे. नीलेश लंके, तू किस झाड की पत्ती?’ अशा शब्दांत अजित पवारांनी मविआ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार, आमदार नीलेश लंके यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

अहमदनगरमध्ये नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, ”ते म्हणतात मी सकाळी लवकर उठतो. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात. आणि दमदाटीचेही राहू द्या. कोण घाबरत नाही त्याला. आजच्या सभेत तर कुणीतरी त्यांचे भाषण चालू असतानाच समोरून ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ अशी घोषणा दिली. दमदाटी केली तर ती सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही ती खपवून घेणार नाही. नीलेश लंकेला जे दमदाटी करतात त्यांना मला विनम्रपणे सांगायचे आहे, दमदाटी तुमच्या घरात चालवा, बाहेर नका चालवू”, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!