मुंबई वृत्तसंस्था
रुपाली चाकरणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात कलगीतुरा सुरूय. रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाकणकर यांना पक्षातूनच विरोध होत आहे. एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
यावर रुपाली चाकरणकर प्रत्युत्तर देत म्हणाल्या की, “एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही आणि बाहेरच्या पक्षातून आमच्या पक्षात आलेल्या व्यक्तींना पक्षाची वैचारिक भूमिका माहित नाही, पक्षाची ध्येय धोरण माहित नाहीत. त्यामुळे सातत्याने एकच व्यक्ती टीका करत असेल तर समजून जावं की मानसिकता काय आहे, मला ते फार महत्वाच वाटत नाही. राज्यभर काम करत असताना राज्यात संघटना उभी केली. आयोगाचं काम करत असताना आयोगातील काम केलं आहे, त्यामुळे अशा व्यक्तींवर बोलण मला फार उचित वाटत नाही.
यावरही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या ”रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते. मला नाही वाटत, अशा बाईला उत्तर सारखं द्यावं. कारण की, रुपाली चाकणकरांना लोकांतून निवडून येण्याचा अनुभव कमी आहे. त्यांना असे वाटते की, पक्षाची तत्वे आणि पक्षाचे प्रोटोकॉल, फक्त छान साडी घालून बसलो म्हणून नेते होतो. त्या गैरसमजातून, पूर्वीच्या माझ्या मैत्रिणीने त्यातनं बाहेर यावे. चाकणकरांना वाटतंय पक्ष त्यांच्या माहेरच्यांकडून आंदण आलेला आहे. त्या म्हणतील तसा पक्ष चालेल. तर तसा विषय नाही आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे.