अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील अक्कलकोट ते स्टेशन रोड मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या काळवीटला टमटम ने जोरदार धडक दिल्याने काळवीट आणि टमटम चालक दोघेही गंभीर जखमी झालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार 23 मार्च 2024 रोजी रात्र 10 वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट होऊन स्टेशन कडे टमटम जात असताना एका मागून एक रस्ता ओलांडणाऱ्या हरणांच्या कळपातील एक काळवीटला टमटमचा जोरदार धडक बसला या धडकेने टमटमची तीन वेळा पलटी होऊन चालकाच्या अंगावर पडल्याने चालक गंभीर जखमी झाले असून त्यास उपचारार्थ सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर गंभीर जखमी झालेल्या काळवीटला रात्रभर पोलिसांच्या परवानगीने टमटम चालकाच्या घरी ठेवून सकाळी सागर चव्हाण, लक्ष्मण चव्हाण,सागर अशोक चव्हाण, यांच्या मदतीने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल अजित बहिरगुंडे सुभाष दासरे सिकंदर मुल्ला यांनी जखमी काळवीटला अक्कलकोट मिनी पॉली व्हेटर्नरी क्लिनिक अक्कलकोट येथे उपचारार्थ दाखल केली असता पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विष्णू कोळेकर यांनी प्राथमिक उपचार करून वनविभागाच्या स्वाधीन केले सदरील जखमी काळवीटला अक्कलकोटला आणून उपचार करून वनविभागाच्या स्वाधीन करन्या पर्यंत पशुप्रेमी शिवराज स्वामी उद्योगपती विलास कोरे एडवोकेट विजय हर्डीकर मल्लिनाथ बहिरजे दुधनी बाजार समितीचे सचिव स्वामीनाथ स्थावरमठ श्रीकांत झिपरे बाबासाहेब सुरवसे यांनी परिश्रम घेतले.