---Advertisement---

संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक

By team
On: November 5, 2024 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

 

विधानसभेच्या पाश्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. रिक्त महासंचालक पदासाठी फणसळकर यांच्यापाठोपाठ संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि रितेश कुमार यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र  राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

काही दिवसापासून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी आरोप सुरू होते. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली होती. दरम्यान, काल निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले होते. बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.

 

आयपीएस संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते एप्रिल २०२८ मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या डीजीपी पदासाठी ते आघाडीवर होते.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!