सोलापूर : प्रतिनिधी
सराफ कट्टा येथील सराफ अभय कुलथे यांना एका अज्ञात व्यक्तीने गंडवून जवळपास २ लाख ९० हजार रुपयांची रक्कम हातोहात घेऊन लंपास केला. अभय कुलथे यांचे मुथूट फायनान्सचे मॅनेजर गुरुनाथ वाघमारे यांच्याशी ओळख आहे. या ओळखीतून वाघमारे यांनी कुलथे यास कोणी ग्राहक सोने गहाण ठेवण्यासाठी आले किंवा इतरत्र सोनाराकडे सोने गहाण ठेवले असेल तर त्यांना फायनान्समध्ये कमी व्याज दराने कर्ज देऊ असे सांगितले.
मिळालेल्य माहितीनुसार, त्यांना फायनान्समधून रक्कम मिळेपर्यंत रकमेची व्यवस्था करीत जावा. त्यापोटी एक टक्का ग्राहकाकडून कमिशन दिले जाईल, असे सांगितले. १ डिसेंबर रोजी वाघमारे यांनी फिर्यादीस फोन करून एका ग्राहकाचे सोने रेवणकर सराफाकडे तारण आले असून ते सोडवण्यासाठी १ लाख ९० हजार रुपयाची गरज आहे. त्याची तरतूद करा. ग्राहकांना आपल्याला आपल्याकडे पाठवून देतो, असे सांगितले. थोड्याच वेळात एका नंबरवरून कुलथे याना कॉल आला व त्यांनी मी हर्षल बोलतो, असे सांगितले. फायनान्स येथील साहेबांनी तुमचा नंबर दिला आहे. माझे सोने सोडवायचे आहे. मला २ लाख ९० हजार रुपये द्या. त्यानुसार विजय कुलथे यांनी त्या व्यक्तीच्या हातात २ लाख ९० हजार रुपये दिले. तुम्ही तुमची गाडी घ्या. आपण दोघे मिळून सराफाकडे जाऊ, असे फिर्यादीने ‘त्या’ व्यक्तीस सांगितले. विजय कुलथे हे गाडी काढत असतानाच ‘तो’ अनोळखी फरार झाला. त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्याचा मोबाईल क्रमांकही बंद आहे. सलग तीन दिवस वाट पाहिल्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय कुलथे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.