---Advertisement---

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By team
On: December 4, 2023 10:18 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा शहरातील शहरातील दामाजी चौक ते बोराळे नाका या दरम्यान शनिवारी (दि. २) दुपारी घडली. याप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकांत सदाशिव डांगे (वय ४२, रा. पाटखळ) असे मृताचे नाव असून, अजमोद्दीन अंबीर पटेल (रा. ब्रह्मपुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदाशिव डांगे (रा. पाटखळ) यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यकांत डांगे हे दुचाकीवरून (क्र. एमएच १३ ईजी १८६३) शनिवारी दुपारी १.१५ वाजता बँक ऑफ इंडियामध्ये गेले होते. ते पुन्हा दामाजी चौकाकडून बोराळे नाक्याकडे जात असताना बँक समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने (एमएच १३ एएक्स ४९९०) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात सूर्यकांत डांगे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी १०८ अॅम्ब्युलन्सला फोन करून सूर्यकांत यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!