अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील दुधनी व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व श्री गुरुशांतलिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनीच्यावतीने यावर्षीपासून स्कूल बसची सोय करण्यात आली आहे.संस्थेचे चेअरमन शंकर म्हेत्रे व श्री. म. नि. प्र डॉ. शांतलिगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते या स्कूल बसचे पुजन करून लोकार्पण करण्यात आले.यामुळे ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे.
बोरोटी,आंदेवाडी,चिंचोळी मैं, सिन्नूर ,दुधनी ग्रामीण या गावातील विद्यार्थी – विद्यार्थिनींची स्कूल बस अभावी गैरसोय होत होती. ती आता थांबणार आहे.या बसमध्ये एका वेळी ५० विद्यार्थी बसू शकतील. दोन फेऱ्या करून विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली आहे.मध्यंतरी शाळेच्या पालक सभेत पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थेचे सचिव प्रथमेश म्हेत्रे यांच्याकडे स्कूल बसची मागणी केली होती.त्यावेळी त्यांनी जूनला बस देण्याची हमी दिली होती.त्यानुसार पूर्तता करण्यात आल्यामुळे विद्यार्थी पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षणासाठी अजूनही भविष्यात आपण मदत करू, अशी ग्वाही चेअरमन शंकर म्हेत्रे यांनी दिली.यावेळी सिद्धाराम येगदी, सिद्धाराम पाटील,बसवराज हिरतोट,शरणगौडा पाटील,रामचंद्र गद्दी, महादेव खेड, एकनाथ मोसलगी,सुनील आडवीतोटे,श्रीशैल माळी, बसलिंगप्पा पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.