---Advertisement---

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना खबरदारी घेण्याची केली विनंती

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये असे म्हंटले आहेत कि, “काल संध्याकाळी प्रथम लक्षणे जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी सकारात्मक चाचणी झाली. माझी लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला वेगळे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांना खबरदारी घेण्याची विनंती अशी ट्विट प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहेत.

प्रा.वर्षा गायकवाड हे काल हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी अनेक आमदार गायकवाड यांच्या संपर्कात आल्यामुळे विधानभवनात चिंता वाढली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!