ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुरक्षा यंत्रणा अलर्ट : राममंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

अयोध्या: वृत्तसंस्था

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. पाकिस्तानमधील कुख्यात प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ ने राममंदिराला बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी दिल्याचे वृत्त शुक्रवारी उजेडात आले. त्यानंतर मंदिर परिसर व अयोध्या नगरीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर पोलीस नजर ठेवून आहेत. याचवेळी सुरक्षा यंत्रणेला दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या उत्तर प्रदेश, राजस्थान व दिल्लीतील भाविकांच्या बसवर ९ जून रोजी हल्ला झाला त्यानंतर खोऱ्यातील कठुआ व दोडा जिल्ह्यात अतिरेक्यांनी विविध ठिकाणी हल्ले केले. आता अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. हल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर, राममंदिर आणि अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजकरण नय्यर यांनी विमानतळ व राममंदिराला भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!