---Advertisement---

खा.प्रणिती शिदेंची ग्वाही : त्यास मी तडा जाऊ देणार नाही

By team
On: June 15, 2024 10:53 AM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : वृत्तसंस्था

मी प्रथम जनतेची सेवक आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवणे, तसेच मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. ज्या आशेने व उद्देशाने जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्यास मी तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

येथील दाते मंगल कार्यालयात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी माजी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, ‘विठ्ठल’चे माजी चेअरमन भगीरथ भालके, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, बबनराव आवताडे, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे, कल्याणराव पाटील, नागेश यादव सुभाष भोसले, प्रशांत शिंदे, राहुल कौलगे पाटील आदी उपस्थित होते. पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समावेश केंद्राच्या सुचित करुन जास्तीत जास्त विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही खा. शिंदे यांनी सांगितले. सुशिलकुमार शिंदे, भगीरथ भालके, संभाजी शिंदे, सुभाष भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!