---Advertisement---

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी

By team
On: April 28, 2024 9:50 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कापत भाजपने येथून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याविरोधात आता निकम लढत देणार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना दोन दिवसांपूर्वीच उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. गायकवाड यांच्या विरोधात महायुतीत भाजप येथून कोणाला उमेदवारी देणार याबाबत बरेच तर्कवितर्क सुरू होते. भाजपत अनेक नावांवर चर्चा सुरू असल्याचे समोर आले होते. अखेर भाजपने शनिवारी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना येथून उमेदवारी दिल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. मागील काही महिन्यांपासून निकम यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!