---Advertisement---

संसदीय राजकारणातून शरद पवार निवृत्ती घेणार ?

By team
On: November 5, 2024 7:51 PM
Follow Us:
---Advertisement---

बारामती वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करून सभा घेत आहेत, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे.

“मी सत्तेत नाही. मी राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत 14 निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे” असंही बारामतीत दौऱ्यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांनी हल्लाबोल केला आहे. ‘काही लोकं सांगतात, मी लोकांना सांगेल भावनेने आवाहन करेल, काही गरज नाही मी माझ्या लोकांना ओळखतो. सुप्रिया सुळे यांना 48 हजार मते जास्त देईल, त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपण आपले प्रश्न सोडवून घेऊया. मला आता आमदारकी नको , खासदारकी नको मला लोकांचे प्रश्न सोडवायचेत. जर आपल्या विचारांचे सरकार आले तर भक्कमपणे युगेंद्र इथले प्रश्न सोडवेल, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!