---Advertisement---

अजितदादांच्या आमदाराची शरद पवारांना नोटीस

By team
On: November 9, 2024 12:30 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे वृत्तसंस्था 

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदाराने शरद पवारांना कोर्टात खेचण्याची नोटीस दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सभा पार पडली. या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मागच्या वर्षी आम्ही वेगळ्या व्यक्तीसाठी तिकीट मागितलं, ज्यांच्या एबी फॉर्म वर शरद पवारांची सही आहे. त्या व्यक्तीने काय केलं तुम्हाला माहिती आहे. त्या व्यक्तीने पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे की पोर्शें अपघात प्रकरणी माझी बदनामी केली तर तुम्हाला कोर्टात खेचेन, असा खळबळजनक गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केल आहे.

तसेच शरद पवारांना तुम्ही नोटीस पाठवली, शरद पवार ईडीच्या नोटीसला देखील घाबरत नाही तुमच्या नोटीसला काय घाबरणार, असा पलटवार देखील सुप्रिया सुळे यांनी नोटीसीवर दिला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी स्वतः नोटीस पाहिली नाही आहे, पण मंचावर एका व्यक्तीने ती बघितली आहे. सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे की जर तुम्ही पोर्शे केसमध्ये माझी बदनामी केली तर तुम्हाला कोर्टात खेचू, असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

तसेच हा देश अदृश्य शक्तीने चालणार नाही, संविधानाने चालणारा आहे. त्यामुळे पौर्शे चालकाकडून हत्या झाली असेल तर आम्ही बोलणारच. स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात गेले होते हे तुम्ही रिपोर्ट केले आहे. आणि पवार साहेब जर खरं बोलले तर त्यांना वकिलातून नोटीस पाठवणार, सत्यमेव जयते आम्ही तयार आहोत, असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!