---Advertisement---

शरद पवार गट आक्रमक : आ.रोहित पवारांची आज पुन्हा चौकशी !

By team
On: February 1, 2024 10:58 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते आ.रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरु होती ती चौकशी आज पुन्हा होणार आहे. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. चौकशीचा निषेध म्हणून आज प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे नेते तसेच पदाधिकारी उपोषण करणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांबाहेर घंटानाद आंदोलन करणार आहे.

रोहित पवारांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांतर्फे ‘वारसा विचारांचा, मार्ग संघर्षाचा’, लडेंगे और जितेंगे अशा आशयाचे बॅनर लावत रोहित पवारांना बळ देण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!