---Advertisement---

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्ह

By team
On: February 23, 2024 7:28 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी बहाल केले. पक्षाच्या ‘एक्स’ (ट्विटर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वरून रात्री उशिरा ही माहिती देण्यात आली.

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत निकाल देताना ६ फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचे म्हणत, त्यांना ते पक्षनाम व घड्याळ हे चिन्ह दिले होते. त्यावेळी शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर आता शरद पवार यांच्या या पक्षास ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!