ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांचे टेंशन वाढणार ? ; माढा मतदारसंघावर शेकापच्या जयंत पाटील यांचा दावा

सोलापूर : प्रतिनिधी

देशातील लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना आता माढा लोकसभा मतदारसंघावर आता शेकापने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये पेच वाढण्याची शक्यता आहे. यासाठी सांगोला येथे शेकापने भव्य मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले आहे. सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापाला मिळावेत, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी केल्याने आता मविआत पेच निर्माण होऊ शकतो.

दरम्यान सांगोलामध्ये आमदार जयंत पाटील, शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकत्यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात आमदार पाटील यानी इंडिया आघाडीमधून माढा आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावे यासाठी आग्रही मागणी केली. या मतदारसंघात शरद पवार, रासपचे महादेव जानकर यांच्यानंतर आता नव्या पक्षाने दावा सांगितल्याने माढयाचा तिढा आणखी वाढणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजप विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून महायुतीवर नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांनी महादेव जानकर यांना थेट साद घालत त्यांच्या कोट्यातील माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. आता महादेव जानकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर महाविकास इंडीया आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी देखील या जागेवर दावा केला आहे. बारामती, माढा या मतदारसंघांमध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना मोठ्याप्रमाणावर मतदान झाले होते. जानकरांची हीच ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविल्याचे समज

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!