ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनावर शिवसेना-मित्रपक्षाची आदरांजली

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेसह आजचे सर्व कार्यक्रम रद्द : धनेश अचलारे

कासेगाव : प्रतिनिधी 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची दुःखद बातमी पसरल्याने सर्वत्र दुखवटा व्यक्त केला जातोय. राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत ही अपघाती घटना घडल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्षाचे बुधवारचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोरामणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनेश अचलारे यांनी शोकसभेत सांगितले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे बुधवारी सकाळी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं होते. या निमित्ताने धनेश अचलारे, कासेगांव पंचायत समिती गणाचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अप्पा धनके त्यांच्या समर्थकांसह कासेगांव आले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याचं वृत्त सोशल मिडियावर पसरले होते.

ही दु:खद घटना समजल्यानं पदयात्रा रद्द करण्यात आल्यावर आयोजित शोकसभेत, धनेश अचलारे, अप्पा धनके, पुरुषोत्तम वाडकर आणि कासेगांवचे माजी सैनिक शहाजहान शेख आणि रणजित चौगुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने राज्याच्या प्रशासनावर पकड असलेले एक धाडसी, अभ्यासू अन् कणखर नेतृत्व हरवल्याची भावना व्यक्त करून, ही राजकीय पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दात संवेदना व्यक्त झाल्या.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना प्रचारार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे बुधवारी सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दु:खद घटनेमुळे शिवसेना आणि मित्रपक्षाचे या भागातील सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही बोरामणी गटाचे उमेदवार धनेश अचलारे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!