ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून रिंगणात 

ॲड.फारियाशाजनीन टिनवाला यांची माहिती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट शहरातील रस्ते, स्वच्छता, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, महिलांसाठी सुरक्षा आणि संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविणे अशा मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी शिवसेना शिंदे गट ही निवडणूक लढवत असल्याची माहिती प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार ॲड. फारियाशाजनीन टिनवाला यांनी दिली.
निवडून आल्यानंतर या सर्व कामांची वचनबद्धता आम्ही पाळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रभाग क्र.७ मध्ये उमेदवारांनी तिसरी प्रचार फेरी पूर्ण करून मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्यात नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेण्यात आले. यावेळी उमेदवारांसोबत स्थानिक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती दिसून आली. या प्रभागात शिवसेनकडून नुरुद्दीन बागवान आणि ॲड. टिनवाला हे आपले नशीब आजमावत आहेत.मतदारांशी बोलताना ॲड. टिनवाला यांनी स्वर्गीय माजी नगराध्यक्ष महम्मद शफी टिनवाला यांच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांच्या विकासदृष्टी, शिस्त आणि लोकसेवेच्या भावनेचा वारसा आमच्या कुटुंबात आजही जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगराध्यक्ष पदासाठी रईस टिनवाला यांना मिळणारा जनसमर्थनाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, त्यांच्या पाठीशी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची ताकद असून ते सक्षम नेतृत्व देऊ शकतात. ही केवळ सत्ता मिळवण्याची निवडणूक नसून शहराच्या आणि भावी पिढीच्या विकासाचा प्रश्न असल्याचेही त्यांनी मतदारांना संबोधित करताना
स्पष्ट केले.

या प्रचार फेरीत नुरुद्दीन बागवान, इम्रान फुलारी, म. इक्बाल टिनवाला, मजहर टिनवाला, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली हवनूर, मोहसीन बागवान, मुजाहिद बागवान, जब्बार बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!