ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बंडाळीचा डाग सोलापूर शिवसेनेवर पडला नाही; पडणारही नाही : पुरुषोत्तम बरडे

 

सोलापूर – आजवर भल्या भल्या नेत्यांनी बंड केलं, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना कायम अभेद्य राहिली, आत्ताही संघटनेतील सर्व पदाधिकारी एकमुखाने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याचसोबत आहेत आणि भविष्यात ही इथल्या शिवसैनिकांची निष्ठा शिवसेनेसोबत, बाळासाहेबांच्या विचारांसोबत व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे या नेतृत्वासोबत राहील अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली.
मुंबईहून आलेले दक्षिण सोलापूरचे संपर्कप्रमुख प्रकाश चव्हाण, शहर उत्तरचे संपर्कप्रमुख काशीनाथ बासुतकर व शहर मध्यचे संपर्कप्रमुख शशिकांत आगवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. सदर बैठकीला शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, दत्तात्रय वानकर, भीमाशंकर म्हेत्रे, संतोष पाटील, दक्षिण तालुकाप्रमुख योगीराज पाटील, युवा सरपंच कोमल करपे, कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी, माजी नगरसेवक बापू ढगे, युवासेनेचे नुतन जिल्हा युवा अधिकारी बालाजी चौगुले, शहर उत्तर समन्वयक महेश धाराशिवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यपदी पुरुषोत्तम बरडे व गणेश वानकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. बरडे यांच्यासह युवासेनेचे बालाजी चौगुले यांचा फेटा बांधून, मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना पुरुषोत्तम बरडे यांनी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे व राज ठाकरे यांच्या बंडावेळी जिल्ह्यातील शिवसेना कशी अभेद्य राहिली याचा इतिहास मांडला. कितीही गाजावाजा झाला, तरी पक्ष सोडणाऱ्यांना आज पर्यंत जनाधार मिळविता आला नाही. आजही सर्वसामान्य जनता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याच सोबत आहे. आगामी काळात सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांमध्ये शिवसेनेचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असं आवाहनही त्यांनी केलं.
मुंबईहून आलेल्या तीनही संपर्कप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क वाढवावा. पक्ष संघटनेची बांधणी अशीच मजबूत ठेवावी व लोकांसाठी संघर्षाची तयारी ठेवावी असे मत व्यक्त केले.
याशिवाय गुरुशांत धुत्तरगांवकर, प्रा. दासरी, प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर यांनीही मनोगत व्यक्त करित पुन्हा नव्या जोमाने संघटनेची ताकद वाढवू असा विचार व्यक्त केला.
या बैठकीस दत्ता गणेशकर, विजय पुकाळे, अतुल भवर, अक्कलकोट उपतालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, विद्यार्थी सेनेचे तुषार आवताडे, उपशहरप्रमुख मलिक हब्बू, रविकांत कांबळे, खंडू सलगरकर, संताजी भोळे, बाळासाहेब गायकवाड, रतन खैरमोडे, रेवण बुक्कानुरे, अमित भोसले, धनराज जाधव, रेवण पुराणिक, दिनेश चव्हाण, सुरेश जगताप, धनराज जानकर, सचिन गंधुरे, सिध्दाराम खजुरगी, जयराम सुंचू, बालाजी विठ्ठलकर, सोमनाथ शिंदे, अनिल दंडगुले, मोहसीन शेख, राजू बिराजदार, रोहित तडवळकर, सुशिल कन्नुरे, संजय गवळी, संजय साळुंके, जयंत कदम, शिवा कोळी, गजेंद्र माशाळे, सचिन माने, राहुल गंधुरे, संकेत गोटे, उमेश जेटगी, राम वाकसे, रविकांत गायकवाड, शिवा ढोकळे, रविंद्र कोळी, नाना मोरे, अण्णा गवळी, आबा सावंत, सुनील यादव व काटवे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!