अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट शहरातील हजारो हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरूसास उद्या (दि.३ )जुलै पासून प्रारंभ होत आहे.५ जुलैपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.३ तारखेला गंध,४ तारखेला उरूस यात्रा तर ५ तारखेला जियारत आहे.त्याकरिता दर्गा परिसर नयनरम्य विद्युत रोषणाईने सजवण्यात आला असून तिन्ही दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था
व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली यांनी दिली. यात्रा उत्सव करिता संस्थापक अध्यक्ष दर्गाहप्रमुख हाजी नसरोद्दीन मुतवल्ली यांच्यासह दर्गाह ट्रस्टचे सर्व विश्वस्त व मुजावर बांधव परिश्रम घेत आहेत .
हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरूसास उद्यापासून पासून प्रारंभ
On: July 2, 2022 6:02 PM
---Advertisement---










