---Advertisement---

वागदरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री परमेश्वर रथोत्सव कार्यक्रम

By team
On: April 14, 2024 9:25 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

वागदरी येथील श्री परमेश्वर रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला .रथोत्सव चालु असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली .यामुळे उकाड्यापासुन त्रस्त झालेल्या भक्तांना दिलासा मिळाला.

वागदरी परमेश्ववर रथोत्सव निमित्त आज पहाटे चार वाजता श्री च्या मूर्तिस महाभिषक व त्यानंतर दुपारी २ वाजता मोठ्या रथावर कळसारोहण संपन्न झाला .गेल्या वर्षी चाक निखळुन अपघात झाल्यामुळे या वर्षी पंचकमिटी कुढल्याही प्रकारचे जोखीम न घेता सर्व विधी व पूजा करून भक्तिमय वातावरणात गरज पडल्यास क्रेनचा वापर करून रथोत्सव पूर्व कार्यक्रम पूर्ण केला .संध्याकाळी ६.२१ वाजता रथोत्सव ला प्रारंभ झाला.नवीन रथ असल्यामुळे भक्तगण मोठ्या संख्याने उपस्थित होते.कुढल्याही प्रकारचे विघ्न न येतो रथोत्सव मोठ्या उत्साहात व वैभवपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
रथोत्सव कार्यक्रमात नाशिक येथील ढोल संघ आकर्षणाचे केंद्र ठरला .त्या व्यतिरिक्त पालखी मिरवणुक लहान उचाई मिरवणुक मल्लिकार्जुन कवडी संघ नगारी रथोत्सावात सहभाग झाले.या वेळी कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये म्हणुन कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी ग्रामस्थांचे वर्गाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!