ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसच्या हर घर तिरंगा उपक्रमाचा समारोप,शहरातील रॅलीला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद

 

अक्कलकोट,दि.१६ : अक्कलकोट
शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त अक्कलकोट शहरामध्ये भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये हजारो युवकांनी सहभाग घेत देशभक्तीचा जागर मोठ्या प्रमाणात केला.या रॅलीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.भारत देशास स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पुर्ण झाली. स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी केली होती.अनेक काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबांची वाताहत झाली. अनेक नेत्यांना प्राणास मुकावे लागले.हा इतिहास आजच्या युवकांनी घरोघरी सांगावा,
असे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त तालुक्यात काँग्रेसने पाच दिवस पदयात्रेचे आयोजन केले होते.याचा समारोप १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला.काँगेस कमिटी कार्यालयापासून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर एस.टी स्टँड,हन्नूर चौक,कारंजा चौक,मेन रोड, फत्तेसिंह चौक,विजय कामगार चौक मार्गे पुन्हा काँग्रेस कमिटी येथे येऊन या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे व ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी यांच्या नेतृत्वाखाली ही मोटारसायकल रॅली निघाली. या रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. युवकांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दुचाकी वाहनास तिरंगा लावण्यात आला होता. या रॅली मध्ये युवा नेत्या शितल म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे, विजयकुमार हत्तुरे, मल्लिकार्जून पाटील,दिलीप सिध्दे,सद्दाम शेरीकर,अरुण जाधव,बाबासाहेब पाटील,काशिनाथ गोळळे,बसवराज अळ्ळोळी,शिवराज स्वामी,नावेद डांगे, मत्तीन पटेल, सरफराज शेख, मुबारक कोरबू, शाकिर पटेल,यश जाधव,समीर शेख,चंदन आडवीतोटे,सुनिता हडलगी, मंगल पाटील,रामचंद्र समाणे, लाला राठोड, फारूक बबर्ची,महादेव चुंगी,नितेश राठोड, विलास राठोड,
वली कुरेशी,शबाब शेख, मैनूद्दिन कोरबु, वकील बागवान, उल्हास सुर्यवंशी, जब्बार बागवान, सलील येळसंगी,सिध्देश्वर हत्तुरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!