ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ रंगांमध्ये अनोख्या पाककृतींचे प्रदर्शन

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.१६ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव
अभियानांतर्गत ७५ तिरंगाच्या रंगांमध्ये अनोख्या पाककृतींचे प्रदर्शन अक्कलकोट पंचायत समिती येथे महिला बालकल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले होते.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान अंतर्गत केंद्रस्तरावरून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महिला विभागाकडून अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख उपस्थित होते.सदर कार्यक्रमाची मूळ रूपरेषा देशाची शान असलेल्या तिरंगा ध्वजच्या तीन रंगांमध्ये विविध आहारातील पाककृती बनवण्याबाबत बनवण्यात आल्या
होत्या. विशेष करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ प्रकारच्या वेगवेगळ्या पाककृती तिरंगा रंगात बनवून सादर करण्यात आल्या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक गटविकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केले.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी स्वतःहून हे पाककृती बनवली असल्याचे सांगितले. सोबतच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मान चिन्ह, ट्रॉफी देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी गौरविले.यानंतर तालुक्यात राबविण्यात आलेल्या अंगठामुक्त अभियानाचे शुभेच्छा पत्रही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे कौतुक केले.यावेळी गट विकास अधिकारी सचिन खुडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे, डॉ.दिनेश मुरूमकर, शितल बुलबुले, उमेश काटे ,दयानंद परिचारक ,मेघराज कोरे, तुळजापुरे,जमादार, शिंदे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!